आधुनिक शेतीसाठी ईश्वरी ट्रेडर्सचा पुढाकार, सारथी मल्चिंग व ISI पाइपला शेतकऱ्यांची पसंती

आधुनिक शेतीसाठी ईश्वरी ट्रेडर्सचा पुढाकार, सारथी मल्चिंग व ISI पाइपला शेतकऱ्यांची पसंती

मांडवे बुद्रुक : आधुनिक शेतीमध्ये उत्पादन वाढ, पाण्याची बचत आणि तण नियंत्रणासाठी मल्चिंग पेपरचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मांडवे बुद्रुक येथील ईश्वरी ट्रेडर्स येथे उच्च दर्जाचे सारथी मल्चिंग उपलब्ध झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांकडून या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ईश्वरी ट्रेडर्सचे प्रोप्रायटर तथा माजी सैनिक मा. श्री. संजय गुंड यांनी माहिती देताना सांगितले की, शेतीमध्ये जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान बनले आहे. यासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि टिकाऊ मल्चिंग उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेले सारथी मल्चिंग हे उच्च प्रतीच्या साहित्यापासून तयार करण्यात आले असून, ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

हे मल्चिंग जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच मातीची धूप रोखणे, तणांची वाढ कमी करणे आणि पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे यामध्येही ते प्रभावी ठरत आहे. विशेष म्हणजे हे मल्चिंग UV Protected असल्यामुळे तीव्र उन्हाळा, पाऊस आणि बदलत्या हवामानातही अधिक काळ टिकून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकाळ वापराची खात्री मिळत आहे.

ईश्वरी ट्रेडर्समध्ये सध्या 21 मायक्रॉन, 25 मायक्रॉन तसेच 21 ते 50 मायक्रॉनपर्यंत विविध प्रकारचे मल्चिंग पेपर उपलब्ध आहेत. भाजीपाला, फळबाग आणि नगदी पिकांसाठी या मल्चिंगचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ईश्वरी ट्रेडर्सचे व्यवस्थापक मा. श्री. प्रशांत बिडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार सिंचन साहित्य उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे दुकानात Resoplast आणि Ecogreen कंपनीचे ISI प्रमाणित ड्रिप बंडल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय शेतीसाठी आवश्यक असलेले कोठारी कंपनीचे ISI पाइप देखील २ इंच, अडीच इंच, ३ इंच आणि ४ इंच अशा सर्व श्रेणीमध्ये माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले ड्रिप साहित्य, सिंचन साहित्य, मल्चिंग पेपर आणि पाइप साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय होत आहे. दर्जेदार साहित्य, योग्य दर आणि विश्वासार्ह सेवा यामुळे ईश्वरी ट्रेडर्स हे शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे केंद्र बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

साकुर पठार भाग, म्हैसगाव, टाकळी ढोकेश्वर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी दर्जेदार मल्चिंग, ड्रिप सिंचन साहित्य आणि ISI पाइपचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वरी ट्रेडर्सतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :

मा. श्री. संजय सयाजी गुंड (माजी सैनिक)
मो. 8577853712

मा. श्री. प्रशांत राजेंद्र बिडकर (मॅनेजर)
मो. 8390951696

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *